होप, शेफर्डने केली इंग्लंडची धुलाई

पहिल्या सामन्यात सहज विजय


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार होप आणि शेफर्डच्या तुफानी फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव केला. शाई होपच्या कर्णधार खेळीमुळे पाहुण्या संघाला 325 धावा करूनही पराभव पत्करावा लागला. अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 7 चेंडू आणि 4 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात शाई होपने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मोठी धावसंख्या उभारूनही त्याच्या गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही.हॅरी ब्रूकच्या 77 धावा, जॅक क्रॉलीच्या 48 धावा आणि सलामीवीर फिल सॉल्टच्या 45 धावांच्या जोरावर इंग्लंडने 325 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड, मोती आणि ओशाने थॉमस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ॲलेक अथेनेस आणि ब्रेंडन किंग या जोडीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. अथानासे 65 चेंडूत 66 धावा करून तंबूमध्ये परतला. ब्रेंडन किंग 44 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. यानंतर केसी कार्टीने 16 धावांचे योगदान दिले.

कर्णधार आणि यष्टिरक्षक शाई होपने 83 चेंडूंत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 109 धावांची नाबाद खेळी करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. शिमरॉन हेटमायर 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर रोमॅरियो शेफर्डने 28 चेंडूत 49 धावांची तुफानी खेळी केली. शाई होपने 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर शतक पूर्ण करण्यासाठी त्याला 82 चेंडू लागले. इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद यांनी 2-2 बळी घेतले. वेगवान गोलंदाज सॅम करनने 9.5 षटकात 97 धावा दिल्या आणि त्याला यश मिळाले नाही.

शाई होपला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 6 डिसेंबर रोजी केनिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे.

Exit mobile version