आ. भरत गोगावले यांची ग्वाही
। माणगाव । प्रतिनिधी ।
तालुक्यातील आशा सेविकांनी आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात शासकीय विश्रामगृह माणगाव या ठिकाणी शुक्रवार, दि. 11 ऑगस्ट रोजी आ. भरत गोगावले यांची भेट घेतली. या बैठकीत आ. गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून रायगड जिल्ह्यातील आशा सेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, युवासेना शिंदे गट जिल्हाप्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख अॅड. महेंद्र मानकर, उपतालुकाप्रमुख नितीन पवार, युवानेते अच्युत तोंडलेकर आदींसह तालुक्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.