। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील तळोजा परिसरातून अपघाताची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोजा सेक्टर 10 मध्ये एका अनियंत्रित कारने रस्त्यावरील 8 ते 10 जणांना भीषण धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
तळोजातील या अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक गाडी सोडून घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.






