माथेरानमध्ये अश्‍वशर्यती

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानच्या मातीत वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडासंकुलात 20 आणि 21 मे रोजी अश्‍वशर्यती पहावयास मिळणार आहे. माथेरान मध्ये येणार्‍या पर्यटकांना मनोरंजनासाठी अन्य पर्यटनस्थळाच्या तुलनेत काही सुविधा उपलब्ध नाहीत. माथेरान युथ सोशल क्लबचे अध्यक्ष प्रशाम दिवाडकर यांनी अश्‍वशर्यतींचे आयोजन केले आहे.

यामध्ये ट्रॉटिंग रेस, भाला रेस, बॉल अँड बकेट, रिले रेस तसेच अन्य शर्यतींचा समावेश आहे. सुट्टयांच्या हंगामात पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या शर्यतीत मुंबई येथील माथेरानप्रेमी हौशी घोडेस्वार आवर्जून हजेरी लावतात. ह्या शर्यतीचा दोन दिवसीय थरार पाहण्यासाठी शर्यतीच्या माध्यमातून पर्यटन वाढून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अद्वितीय कार्यक्रमात माथेरान युथ सोशल क्लबचे पदाधिकारी यांचे सहकार्य प्रशाम दिवाडकर यांना लाभते.

Exit mobile version