पुण्यात हॉटेल चालकाला मारहाण

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यात एका हॉटेल चालकास दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील खराडी भागत रात्री दीड वाजता हा प्रकार घडला आहे. हॉटेल बंद करुन हॉटेल मालक जात होता. परंतु चौघांनी पिझ्झाची मागणी केली. त्यांना पिझ्झा दिला नाही. यामुळे त्यांनी हॉटेल मालकाला दगडाने मारहाण केली.

पुणे येथील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव गेले. त्यांनी त्या ठिकाणी पिझ्झा देण्याची मागणी केली. परंतु हॉटेलचा मालक हॉटेल बंद करुन निघाला होता. हॉटेल मालकाने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला दगडाने मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version