मॅपल आयव्हीचे तपन चक्रवर्ती यांचे प्रतिपादन
| अलिबाग | प्रतिनिधी |
आजच्या काळात हॉटेल मॅनेजमेंट ही एक खूप मोठी इंडस्ट्री बनली आहे आणि ही इंडस्ट्री अनेक मोठ्या वाढत्या इंडस्ट्री पैकी एक आहे. पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वी, सायरस पुनावाला स्कूल नागाव, वाय. एम. पाटील स्कूल सांबरी आणि पीएनपी होली चाईल्ड स्कूल स्टेट बोर्ड वेश्वीच्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट करियर एक सुवर्णसंधी यावर हॉटेल मॅपल आयव्ही वेश्वीचे जनरल मॅनेजर तपन चक्रवर्ती यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या वेगवेगळ्या संधी यावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतले यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी होली चाईल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, शर्मिला शेट्ये, सायरस पुनावाला स्कूलच्या मुख्याध्यापिका रसना व्यास, ॲकॅडमिक डायरेक्टर राजश्री पाटील, श्रुती सुतार, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आणि इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पीएनपी एज्युकेशन ही संस्था फक्त दर्जेदार शिक्षण देत नाही तर मुलांना वेगवेगळ्या चांगल्या करियरच्या वाटा आणि त्यामध्ये असण़ाऱ्या सुवर्ण संधी याचे सुद्धा मार्गदर्शन देत असते. विद्यार्थ्यांना हॉटेल इंडस्ट्री बाबतीत मार्गदर्शन करतांना तपन चक्रवर्ती यांनी संगितले की, प्रत्येक माणूस आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी ‘आत्मविश्वास’ असणे आवश्यक आहे. ‘आत्मविश्वास’ म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर विश्वास असणे किंवा स्वतःवर विश्वास ठेवणे. कोणतेही करियर निवडतांना त्यामध्ये स्वताला आवड असणे गरजेचे आहे.
स्वताची आवड बघून, कामातून मिळणारा आनंद बघून करियरची निवड करावी. पुढे मार्गदर्शन करतांना तपन चक्रवर्ती यांनी संगितले की, प्रत्येक देशामध्ये हॉटेल इंडस्ट्री ही त्या देशाच्या उत्पन्नामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि हॉटेल मॅनेजमेंट या इंडस्ट्रीचा भारताच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे. हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध असतात त्या प्रत्येक कोर्स करिता प्रवेश पात्रता ही वेगवेगळी असते हॉटेल मॅनेजमेंट कोर्स एक प्रोफेशनल कोर्स आहे या अंतर्गत डिप्लोमा डिग्री आणि मास्टर डिग्री कोर्सेस आहेत. आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा कोर्स करायचा आहे तर या कोर्ससाठी आपल्याला दहावी आणि बारावी मध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक असते, डिप्लोमा कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा असतो आणि सर्टिफिकेट कोर्स कालावधी हा सहा महिन्यांचा असतो डिप्लोमा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचे बंधन नसते म्हणजेच आर्टस, सायन्स, कॉमर्समधील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स तीन वर्षाचा असतो या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रकारचे कोर्स आहेत ज्यांचा कालावधी चार वर्षाचा असतो. त्याचप्रमाणे सध्या स्थितीत असलेल्या चांगले कॉलेज आणि प्रवेश प्रक्रिया विषयी माहिती सांगितली.