| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील बहुतांश गावांना देणारी पाताळगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पाताळगंगा नदी प्रदूषण मुक्त वाहत राहावी यासाठी शासन स्तरासह सामाजिक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन जनजागृती अभियान वेळोवेळी राबविण्यात येत असतानाही बहुसंख्य व्यवसायिक या अभियानाकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पाताळगंगा नदी सोडत आहेत.
खोपोली शहरातील सह्याद्रीच्या डोंगरातून उगम पावणार्या पाताळगंगा खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील बहुतांश गावांना नवसंजीवनी देत अनेकांची पाणी टंचाईतून मुक्तता केली असल्याचे पाहायला मिळत आहे, परंतु अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाताळगंगा नदी मोठ्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्याने नदीचे पात्र दूषित झाल्याने पाताळगंगा नदी प्रदूषण मुक्त वाहावी याठिकाणी शासन स्तरासह सामाजिक स्तरावरून जनजागृती करण्यात येत असली तरी कोणतीही कारवाई नसल्याने पाताळगंगा नदी दिवसेंदिवस अधिकच दूषित होत असल्याने पाताळगंगा नदीचे पाणी वापरणार्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खालापूर तहसीलदार, खोपोली पोलीस ठाणे व प्रदुषण मंडळाला निवेदन देत या व्यवसायिकांवर कायदेशीर कारवाई करून जलप्रदुषण थांबवून नदीपात्र साफ करून घेण्याची मागणी केली आहे. जर यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास आंदोलन येईल. – एकनाथ पिंगळें, तालुकाप्रमुख