महाडमध्ये तीन लाखांची घरफोडी

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहरातील सावित्री मार्गावर असलेल्या राजरत्न काँप्लेक्स या इमारतीमध्ये सोमवारी भर दिवसा घरफोडी होवून अज्ञात चोरट्यांनी 3,22,567 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

राजरत्न काँप्लेक्समध्ये 202 क्रमांकाच्या सदनिकेत सूर्यकांत आणि सुजाता घोसाळकर हे दांपत्य राहते. सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घोसाळकर कुटुंब घरी नसताना, अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूमधील कपाट फोडून सोन्याचे कडे, सोन्याची चेन, सोन्याच्या दोन अंगठ्या, डाव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिमा असलले सोन्याचे पेंडंट, सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे हे अधिक तपास करित आहेत.

Exit mobile version