शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

लाखो रुपयांचे नुकसान

। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।

ग्रुप ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक हद्दीतील वडाचामाल (धनगरवाडा) येथे गंगुबाई धोंडू बोडेकर व धोंडू बाळू बोडेकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत माणगाव बुद्रुकचे सरपंच रमेश साळुंखे, माणगाव ग्राम महसूल अधिकारी शिरीष तांबट, राहुल भंडारी सहाय्यक अभियंता शाखा-2 महावितरण यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला दिलासा देत तातडीने पंचनामा करण्यात आला. दरम्यान, गावकऱ्यांनी शॉर्ट सर्किटमध्ये लागलेला घराला आग विझवण्यासाठी तातडीने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा प्रकोप मोठा असल्याने नुकसान टाळता आले नाही. घरातील धान्यसाठा, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य यांसह इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाले.

या घटनेमुळे बोडेकर कुटुंब उघड्यावर आले असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आर्थिक मदत व पुनर्वसनाची मागणी केली आहे.

Exit mobile version