बोरज येथील घर भस्मसात

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील साखर बोरज येथील एका घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत ते घर 80 टक्क्यांहून अधिक जळाले आहे. तसेच, या घराशेजारी नवीन घर बांधणाऱ्या एका कुटुंबाने आगग्रस्त घरामध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पोलादपूर तालुक्यातील बोरज गावातील अशोक झाडाणे हे सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या घराशेजारी नवीन घर बांधणाऱ्या उषा झाडाणे या त्यांच्या घरामध्ये राहत आहेत. दरम्यान, सकाळच्या सुमारास अशोक झाडाणे यांच्या घराच्या छपरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. या धुराचे आगीच्या ज्वाळांमध्ये रुपांतर झाले. त्यानंतर लगेचच घरातील व्यक्ती बाहेर पळाले. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, या आगीत अशोक झाडाणे यांच्या घरातील सामाना आणि सध्या वास्तव्यास असलेल्या उषा झाडाणे यांच्याकडील रोख रक्कम, दागिने, कपडे आणि धान्यसाठा भस्मसात झाला. दरम्यान, ही आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंत, तो पर्यंत सर्वच जळून खाक झालं.

Exit mobile version