। पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर तालुक्यातील गोवेले रस्त्यावरील बोरज-साखर पुल कोसळला. त्यामुळे पोलादपूरमध्ये घडलेल्या दुर्घटनेतील जखमींना तसेच दरडग्रस्तांना मदत करणे अशक्य झाले आहे. परिणामी पोलादपूरमधील संकटात सापडलेल्या नागरिकांनाही मदत करणे अशक्य होत आहे. प्रशासनाने या पूलाकडे दूर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

