लोक अदालतीमधून घरपट्टी वसूल होणार

| अलिबाग | प्रतिनिधी |
घरपट्टी थकित ठेवणाऱ्यांवर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये 20 हजारांहून अधिक थकित घरपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने थकित घरपट्टीधारकांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी शुक्रवारी एक डिसेंबर रोजी याबाबत आढावा घेतला.

थकित घरपट्टी वसुलीची प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबतचा आढावाच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडून तालुक्यात थकित असलेली घरपट्टी व थकित घरपट्टीधारकांना बजावण्यात आलेल्या नोटिसीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव उपस्थित होते. पाच डिसेंबरपर्यंत नोटिसा बजावण्यात याव्यात, असे यावेळी ठरले.

Exit mobile version