‘जल्लोष सुवर्ण युगाचा’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर येथील पी.पी खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनी आणि पी.पी खारपाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक चिरनेर गावात रामनवमीच्या निमित्ताने स्टेप आर्ट डान्स अकॅडमीच्या जल्लोष सुवर्ण युगाचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्टेप आर्ट डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान, उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांचेही या कार्यक्रमात पाय थिरकले. याप्रसंगी चिरनेरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, कंपनीच्या सुनिता खारपाटील, प्रफुल्ल म्हात्रे, शशांक ठाकूर, संतोष म्हात्रे, नितीन नारंगीकर, बळीराम फोफेरकर, विश्‍वास मोकल, अमोल जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नितेश पंडित व राजेंद्र भगत यांनी केले.

Exit mobile version