पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाची विजयी घोडदौड

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे नुकत्याच 5 व 6 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत पीएनपीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धांमध्ये 17 वर्षे गट वयोगट मुले भालाफेक स्पर्धेमध्ये श्रीराज पाटील प्रथम क्रमांक तर थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक, 100 मी धावणे जय जाधव द्वितीय क्रमांक, 1500 मी धावणे प्रीत पाटील द्वितीय क्रमांक, 100 मीटर रिले स्पर्धेत निवेदन रातवडकर, जय जाधव, दक्ष गोसावी, दिवेश पाटील, पार्थ पाटील द्वितीय क्रमांक, 400 मीटर रिले स्पर्धेत प्रीत पाटील, पार्थ पाटील, दक्ष गोसावी, आर्यन नाईक तृतीय क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुले 200 मी धावणे करण मगर तृतीय क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुली लांब उडी स्पर्धेत ऋतुजा पाटील द्वितीय क्रमांक तर 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची पुढील स्पर्धा खालापूर एच.ओ.सी. रसायनी येथे 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहेत.

सर्व विजेत्या खेळाडूंचे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्राचार्य रवींद्र पाटील, क्रीडा शिक्षक तेजेश म्हात्रे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version