खालापुरात भरघोस मतदान

| खोपोली | प्रतिनिधी |

मागील महिनाभर सुरू असलेली कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम आज मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर काही अंशी शांत झाली आहे. खालापुरातील 647 मतदारांपैकी 627 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून विक्रमी संख्या गाठली आहे.


महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ प्रचंड असा उत्साह मतदान केंद्रावर दिसून आला. खालापूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्वच नेते तसेच संतोष जंगम व शिवानी जंगम मतदान केंद्रावर उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या वतीने आज विक्रमी संख्येने झालेल्या मतदानाबद्दल समाधान व्यक्त करीत शेकापचे नेते किशोर पाटील यांनी सर्व शिक्षक मतदारांचे आभार मानले आणि या निवडणुकीत आपण भरघोस मतांनी विजयी होऊ, असा विश्‍वास व्यक्त केला.

Exit mobile version