लोकअदालतीत शेकडो प्रकरणे निकाली

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण 1,317 प्रकरणे ठेवली होती. पैकी एकूण 102 प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून 30 लाख 52 हजार 249 रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश जे. एम. मिस्त्री यांच्या उपस्थितीत ही राष्ट्रीय लोकअदालत झाली. यावेळी पॅनेल समिती सदस्य म्हणून ॲड. डी. के. गावकर उपस्थित होते. या लोकन्यायालयात वादपूर्व 893 प्रकरणांपैकी 78 प्रकरणे निकाली होऊन 10 लाख 30 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रलंबित 424 प्रकरणांपैकी 24 प्रकरणे निकाली होऊन 20 लाख 52 हजार 219 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक ओ. यू. शेख, व्ही. एम. मीर, तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपिक ओ. बी. अडुळकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version