सांडपाण्यावरुन पती-पत्नीला मारहाण

। रसायनी । वार्ताहर ।

सांडपाणी नाल्यात सोडल्याच्या रागातून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना रसायनीमधील लाडीवली गावात घडली. लाडीवली येथे राजेश दत्तात्रय कालेकर हे सांडपाणी नाल्यामध्ये सोडण्यासाठी गेले होते. त्या गोष्टीचा राग हरिश्‍चंद्र धर्मा कालेकर आणि साहिल रामचंद्र कालेकर यांना आला. त्यांनी राजेशला शिवीगाळी करून हाताबुक्याने मारहाण केली. हरिश्‍चंद्र व साहिल यांनी हातात बांबूची काठी घेऊन राजेशला मारहाण करून दुखापत केली. पतीला होत असलेली मारहाण पाहून राजेशची पत्नी रचना या सोडविण्याकरिता आल्या असता त्यांनासुध्दा धक्काबुक्की करून शिवीगाळी केली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सचिन चौरे हे करीत आहेत.

Exit mobile version