| पनवेल | वार्ताहर |
चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पतीने पत्नीवर तलवारीने हल्ला केल्याची घटना उलवे परिसरात घडली आहे. यात महिलेच्या डोक्याला, पायाला दुखापत झाली आहे. उलवे पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान खान (34) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याआधी तो मानखुर्द परिसरात राहत होता. काही महिन्यांपासून ते उलवे मध्ये राहण्यास आहेत. इम्रानला दारूचे व्यसन असून, तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. दरम्यान त्याने पत्नीसोबत झालेल्या भांडणातून तिचे डोके कपाटावर आपटले होते. यामध्ये कपाटाची काच फुटून पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर दोघांत पुन्हा भांडण झाले. त्याने घरात ठेवलेल्या तलवारीने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये तिच्या पायाला दुखापत झाली आहे. पत्नीने अखेर पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पतीने पत्नीवर तलवारीने केला हल्ला
