पतीने केली पत्नीला मारहाण

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

अन्य महिलेसोबत असलेल्या अनैतिक प्रेम संबंधामुळे पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी पतीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात 7 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार या सेक्टर 10, कळंबोली येथे राहत असून त्यांच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे पती त्यांना वारंवार मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करतात. तसेच त्यांच्या मुलांकडे दुर्लक्ष करून त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ करीत आहेत.

Exit mobile version