| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
मद्य पिण्याची परमिशन कोणी दिली, असे विचारून हाताने आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी कळंबोली येथील करण नाईक व अनोळखी व्यक्तीच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकांत कंठाळे हे कळंबोली सेक्टर चार येथे राहत असून ते मित्रांसह मॅकडोनाल्ड शेजारील गॅरेजच्या जवळ मद्यपिण्यासाठी बसले होते. यावेळी अमन यादव तेथील खुर्चीवर मद्य पीत बसला होता. त्यावेळी करण नाईक आणि एक अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि तुम्ही येथे मद्य प्यायला कसे बसला, तुम्हाला येथे बसण्याची परवानगी कोणी दिली, असे बोलून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर गॅरेज जवळील लोखंडी रॉडने त्यांच्या कपाळावर वार केले.







