रायगड प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वडखळ नजीकच्या नवेगाव आदिवासीवाडीवर दशीच्या पायवाटेवर आपली पत्नी सोबत नांदण्यासाठी जात नाही या कारणावरून पटीने पत्नीचा खून केला होता. पत्नीचा खून केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने आरोपी दिनेश बारक्या पवार याला जिल्हा न्यायाधीश 2 व अति सत्र न्यायाधीश, ए. वाय. यत्ते यांनी भा.द.वि. कलम 302 नुसार जन्मठेप व तीन हजार रुपये रकमेचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे..
आरोपी दिनेश पवार याचे आणि दुसरी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्याने दुसरी पत्नी तिची मावशीकडे राहत होती. दिनेश पवार नेहमी मावशीच्या घरासमोर जावून दुसऱ्या पत्नीला सोबत नांदायला येण्यास सांगत असे. परंतु, दुसरी पत्नी कविता ही दिनेश पवारच्यासोबत नांदायला जात नसे. दिनेश पवार याचा मनात राग धरून होता. आपली दुसरी पत्नी साक्षीदार असणाऱ्या महिलेसोबत वडखळ येथे रेशनिंग दुकानावर जावून घरी परतत होती. यावेळी रस्त्यात असणाऱ्या पायवाटेने नवेगाव आदिवासी वाडीत येत असताना दिनेश पवार याने त्यांचा रस्ता आडवून पत्नीला तु माझ्या सोबत नांदायला येत नाहीस काय? असे बोलून तिला हाताबुक्क्यांनी मारहाण करीत त्याने त्याच्या हातीतील चाकु दुसऱ्या पत्नीच्या गळ्यात व पाठीत भोसकुन तिला गंभीर जखमी केले. पत्नीला जखमी करून बाजुच्या नाल्यात ढकलुन देवुन तिला जिवे ठार मारले. यावर दिनेशच्या दुसऱ्या पत्नीचा भाऊ कैलास पवार याने वडखळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी याच्याविरुध्द तक्रार नोंदविली होती. सदर खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलींद पांडकर, यांनी एकूण 13 महत्त्वाचे साक्षीदार तपासले घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अशोक पवार व गोविंद वाघमारे, साक्षीदार भारती पवार व वृषाली पवार, वैद्यकिय अधिकारी औदुंबर किसन कोळी तसेच तपासिक अंमलदार याची साक्ष महत्वाची ठरली.