गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|

रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत गोगावले पालकमंत्री होण्यात माझा पुढाकार होता, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली. रायगडला पालकमंत्री नव्हते म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता. विकास कामे चालूच होती. पर्यटन, मेरीटाईम बोर्ड, रेल्वे अशा सर्वच विभागातील विकासाचा आढावा दिला आहे. या कामांना चालना दिली आहे, असेही तटकरे म्हणाले. अलिबागमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीसी अंतर्गत एक प्रणाली व्यवस्था आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळेलच. रायगड जिल्ह्याला पावणे दोन वर्षे पालकमंत्री नव्हते, म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता. विकास कामे चालूच होती, असे तटकरे म्हणाले. गोगावले पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. त्यात माझाही पुढाकार होता, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version