। चिपळूण । वार्ताहर ।
मार्गताम्हाने गावचे उद्योजक निलेश चव्हाण यांच्या मातोश्री शेवंती चव्हाण यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने आदर्श माता पुरस्कार 17 सप्टेंबर रोजी जाहीर झाला आहे. चव्हाण यांना तीन वर्षापूर्वी श्री आदिशक्ती फाऊंडेशन, पुणे यांच्यावतीने आऊसाहेब पुरस्कार 2018 मध्ये देण्यात आला होता. यावर्षी त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने आदर्श माता पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विलास कोळेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.याबद्दल शेवंती चव्हाण व कुटुंबीयांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.