। दिघी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाकडून दिला जाणारा 2021 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते शाळेचे पदवीधर शिक्षक जगन्नाथ पवार यांना जाहीर झाले आहे.
पवार हे 1992 साला पासून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा 29 वर्षे झाली आहे. त्यांनी लोकसहभागातून शालेय विकास अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी,विज्ञान प्रदर्शन शैक्षणिक साहित्य निर्मिती,100 पटनोंदनी,विद्यार्थी अल्पबचत,वृक्षारोपण,ग्रामस्वच्छता,विद्यार्थी सुविधेसाठी विविध संस्थाचे सहकार्य,शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजना,कोव्हिड 19 कालावधीत सहकार्य व मार्गदर्शन इ.उपक्रमात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जगन्नाथ पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
