अलिबाग: कार्लेखिंडीमधील पात्रुदेवी मंदिरातील मुर्ती चोरीला

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौल येथील दत्त मंदिरत झालेली चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अलिबागमधील कार्लेखिंडीतील पात्रुदेवीच्या मंदिरात चोरी झाली आहे.

अलिबागकरांचे श्रध्दास्थान असलेली कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मुर्ती आणि मंदिरातील अन्य सामान अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बुधवार ११ ते १२ जानेवारी दरम्यान घटली आहे. या घटनेमुळे नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी मंदीराचे कुलुप तोडून मंदीरातील मुर्ती व इतर ७ हजार ८०० रुपये किमतीचा सामान चोरुन नेला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसई ओमप्रकाश कावळे हे करीत आहेत.

Exit mobile version