जर हेच हात सरकारच्या कानाखाली आपटले तर

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा इशारा

। मुंबई । प्रतिनिधी ।

सेवा करणारे हात जार एकमेकांवर आपटले तर मोठा आवाज येतो. जर हेच हात सरकारच्या कानाखाली आपटले तर केवढा मोठा आवाज येईल, असा हल्लाबोल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आझाद मैदानावर बुधवारी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. महापालिका रस्ता देखील सेविकांनी रोखून धरला होता. दरम्यान, ठाकरे यांनी आंदोलना भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.

मी तुमचा भाऊ म्हणून आंदोलनात सहभागी होत आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य अशी बिरुदं लावू शकू, अशी माणसे उरली नाहीत. तुम्ही सर्व सावीत्रीच्या लेकी आहात. असंख्य ज्योती एकत्र येतात. तेव्हा त्याची मशाल तयार होते. हे मशाल सत्ता खाली खेचण्यासाठी पुरेसे आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा संपूर्ण जग कोरानाचा सामना करत होता. तेव्हा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सेवा करत होत्या. मात्र 8 महिने झाले सरकार त्यांचे ऐकत नाहीत. आमचं सरकार पडलं नसतं तर तुम्हाला आंदोलनासाठी मुंबईत यावं लागलं नसतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

माझं ऑपरेशन होताच सरकार पाडलं. या खोके सरकारकडे अंगणवाडीसेविकांच्या हक्काचे मानधन द्यायला पैसे नाहीत. मात्र, सरकारकडे जाहिरातींसाठी पैसे आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Exit mobile version