| तळा । वार्ताहर ।
तालुक्यातील अपंगांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असून येथील अपंगांना आपल्यासाठी असलेल्या सुविधा मिळविण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील शेकडो अपंगांसाठी काही तरी वेगळे करून त्यांना आधार देण्यासाठी पुढे कोणीही येत नसल्याने अपंगामध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. या तालुक्यातील अपंगांना काही आवश्यक वस्तूची गरज आहे. त्यासाठी कुणीही पुढे येत नाहीत. ते आपल्याला आर्थिक मदत नसल्याने त्या वस्तू घेऊ शकत नाहीत. कुणास कुबड्या, व्हीलचेअर, काठी अशा विविध साहित्यांची गरज आहे. परंतु तालुक्यात या अपंगाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
या तालुक्यात कोणतीही कंपनी, कारखाने नाहीत त्यामुळे स्थानिक भागात कुणीही मदत करत नाहीत. परंतु या भागातील स्थानिक खासदार, आमदारांनी याबाबत आपल्या जिल्ह्यातील कंपनीमार्फत सामाजिक दायित्व निधी आणून अपंगांसाठी शिबिरे लावुन त्याच्या तालुका स्तरावर गरजवंताना साहित्य तपासणीअंती देऊ शकतात. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा प्रश्न विचारला जात आहे.