| खोपोली | वार्ताहर |
महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि यशवंती हायकर्स खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने झेनिथ धबधबा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी केमएसीचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, तालुका वनाधिकारी दळवी, पद्माकर गायकवाड, सदाशिव पाटील, राजाबापू सगळगीळे , राजू मोरे, गणेश महाडिक, अरविंद पाटील, निखील गुरव, प्रणीत गावंड, कुणाल पाटील, सौरभ रावल. तसेच सायकल इंडिया ग्रुपचे संदीप ढवळे आणि त्यांचे सहकारी तसेच एनसीसी विभाग संचालक शीतल गायकवाड आपल्या सर्व कॅडेटसह उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षिका उषा केळबायकर यांनी भानवज परिसरामध्ये असंख्य झाडे लावून योग्य ते संवर्धन केले त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी यशवंती हायकर्सचे डॉ. महेंद्र भंडारे, डॉ.प्रताप पाटील यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.वन अधिकारी दळवी आणि त्याच्या सहकार्यांनी सुद्धा जंगलाचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन मच्छिंद्र यादव तर आभार प्रदर्शन सचिव संदीप पाटील यांनी केले.