| आपटा | वार्ताहर |
भावी पिढीला अवकाश ज्ञानाची माहिती अवगत व्हावी या हेतूने इस्त्रोच्यावतीने रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात अवकाश विज्ञान बस आणण्यात आली होती. यावेळी पनवेल तालुक्यातील सर्व लहानमोठ्या व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेतील सातशे मुले व मुली यांनी इस्त्रोच्या अवकाश साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी या मुलांना या अवकाश व सँटेलाईट व उपग्रहाच्या कक्षा व त्या कशा काम करतात व मानवी जीवनातील त्याचे महत्त्व व हवामानात होणार बदल वादळे व शेतकर्यांना उपयुक्त अशा करीता हे सर्व कसे उपयोगी पडते या बाबतीत सर्व माहिती देण्यात आली. आतापर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा हजार विध्यार्थ्यांना यांची माहिती दिली आहे .यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना या बाबतीत खूप उत्सुकता होती व त्याच्या मध्ये गुणवत्ता असून,त्यांना याबाबतची आवड व उत्तम जाणीव आहे असे आढळून आले आहे पिल्लई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अजूनही अनेक ठिकाणी जाऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे असे डॉ नागराजन यांनी सांगितले आहे.
यावेळी इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. जया सक्सेना, साधना जैन,डॉ. कार्तिक नागराजन व पिल्लई महाविद्यालयाच्या डॉ लता मेनन,निवेदिता श्रेयांस व गणेश शिंदे व त्यांचे सहकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.गुरुवारीही हा उपक्रम सुरु राहणार आहे.