बेकायदा गोवंश हत्याः पाच अटकेत

 नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दामत आणि भडवळ गावाच्या मध्यभागी जनावरांचे कातडी आणि हाडे मोठ्या संख्येने आढळून आली होती.सदर प्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने संवेदनशील असलेल्या गुन्ह्यात पाच जणांना ताब्यात घेतले असून आणखी काही संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
दामत या मुस्लिम लोकवस्तीच्या गावाच्या बाहेर शेतामध्ये जनावरांची कातडी आढळून आल्याने या प्रकाराने खळबळ माजली होती.मुस्लिम बहुल दामत गावाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जनावरांची कातडी ओहोलाच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत आढळून आली होतीस आहेत.प्राण्यांची कत्तल करून त्यांची कातडी मोकळ्या मैदानात टाकून देण्यात आली असून त्यातून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने टाकली असल्याचा नमूद केले  आहे.  पोलीस उप अधीक्षक विजय लगारे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक  श्रीकांत काळे यांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.  पथकाने आपले खबरे यांच्या मार्फत गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि गोवंश जनावरे यांची कत्तल करून त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मोकळ्या जागेत त्या प्राण्यांचे मांस वगळता अन्य अवयव टाकून देणारे पाच जणांना नेरळ पोलिसांनी अटक केले आहेत.त्याशिवाय आणखी काही आरोपींचा शोध गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून सुरू आहे.तर दुसरीकडे नेरळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version