म्हसळा वनविभागाची अवैध वृक्षतोड

| आंबेत | वार्ताहर |
रोहा वनविभागातील म्हसळा तालुक्यासह इतर वनविभागात अवैध वृक्ष तोडीचा एक प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचं उघड होत आहे. कोकणात झालेल्या 3 जून 2020 रोजीच्या निसर्ग चक्री वादळात मोठ्या प्रमाणात सरकारी वनांची नुकसानी झाली.मात्र असंख्य झाडे ही या वादळात उन्मळून पडली. हीच बाब लक्षात घेता सदर उन्मळून पडलेल्या वनांचा लिलाव मागील वर्षांपासून सुरु करण्यात आला आणि यामध्ये सालविंडे, वरवठने वनक्षेत्रातील जागेत लिलाव करण्यात आलेल्या झाडांबरोबरच लिलाव न झालेल्या झाडांचा देखील सुफडासाफ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या वनक्षेत्र परिसरात पूर्वी घनदाट जंगल असलेली जागा आता मात्र भुईसपाट करून मोकळा रानमाळ केल्याच काहीसं चित्र आहे. एकीकडे 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आखला असून हेच वनविभाग म्हसळा तालुक्यात सुरु असलेल्या निसर्ग चक्री वादळात कोलमडून पडलेल्या वृक्षांच्या लिलावाच्या नावाखाली 100 ते 150 हेक्टर वनक्षेत्रात लाखो झाडांची कत्तल करताना दिसत आहेत.

दुसरीकडे चक्री वादळातील कोलमडून पडलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5 ते 10 पटीने पूर्ण जंगल साफ करण्याचा धाडस देखील जंगल विभागाचेच अधिकारी करत आहेत. या बेसुमार तोडलेल्या झाडांचा किती माळ निघतो याचा अभ्यास संबंधित अधिकार्‍यांना असून देखील निर्गतीस शिफारस करण्याचा यांचा कोणता मानस होता ही बाब देखील खेदाची असल्याचं बोललं जातं आहे, या गोष्टीचा आढावा घेतला असता तालुक्यात लिलाव झालेल्या क्षेत्रांचा उजाड भाग पाहून पूर्वजांनी जतन करून ठेवलेले वन ठेकेदारांनी पूर्ण नष्ठ केलेले पाहून तालुक्यातील जनता आणि पर्यावरण प्रेमी वनसमिती अध्यक्ष ,आता शोक व्यक्त करत आहे.

शासनाने याबाबतीत लवकरात लवकर सबंधित विभागाची चौकशी करून दोषी ठेकेदारांना अभय देणार्‍या वनाधिकारी यांच्यावर कार्यवाही व्हावी अन्यथा संपूर्ण सरकारी वनांचा वालवंट होण्यास वेळ लागणार नाही. यासबंधीत वनमंत्री प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर, विरोधी पक्षनेते म रा., मा. मुख्य वनसंरक्षक ठाणे प्रादेशिक जि अ रायगड, आणि जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्याकडे समक्ष भेटून या गोष्टीचा भांडा फोड करणार आहोत. असे वनसमिती अध्यक्ष किरण पालांडे यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सदरचे जंगल तपासून न पाहता हे प्रकरण दडपण्याचा प्रकार केल्याचा प्रकार समोर येत आहे यावरूनच वरिष्ठ अधिकार्‍यांचा या प्रकरणात समाविष्ठ असल्याचा ठाम मत येथील नागरिक करत आहेत. दुसरीकडे वाहतुकीस देण्यात आलेल्या परवानग्या व वाहतुकीस शिफारस करणार्‍यांना देखील याची अडचण निर्माण होऊ नये करिता हे प्रकरण दडपण्याचा प्रकार दिसून येत आहे, गेल्या तीन वर्षांपासून वनसमिती अध्यक्षांना विश्‍वासात घेतले जात नाही ही देखील संशयास्पद बाब आह, अशी तक्रार मंदाटने वनसमिती अध्यक्ष राजाराम धुमाळ यांनी केली आहे.

Exit mobile version