अवैध दारूच्या बाटल्या जप्त

Oplus_131072

मांडवा पोलिसांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मांडवा दस्तुरी फाटा येथे अवैध दारू विक्रीविरोधात मांडवा सागरी पोलिसांनी बुधवारी (दि. 13) धडक कारवाई करत 1 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत 921 देशी व विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी प्रकाश प्रेमनाथ जयस्वाल (33), रा. दस्तुरी फाटा, मांडवा, मूळ रा. पटना, बिहार संदिप बिअर शॉपीच्या मागे अवैध दारूची विक्री करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. तपासात त्याच्या शेडमधून मॅकडॉल नंबर 1 ओरीजनल, रॉयल ग्रीन व्हिस्की, डीलक्स ब्लॅक व्हिस्की, ओकस्मिथ गोल्ड, ब्लॅक अँड व्हाईट, ॲबसॉल्ट व्होडका, चिवास रिगल अशा विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या अधिपत्याखाली आणि पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. पुढील तपास मांडवा सागरी पोलिसांकडून सुरू आहे.

Exit mobile version