मटका जुगार अड्ड्यावर छापा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा येथे एका दुकानात बेकायदेशीर मटका जुगार अड्डा राजरोसपणे सुरू होता. मांडवा सागरी पोलिसांनी या अड्ड्यावर शुक्रवारी (दि.10) सायंकाळी छापा टाकला. या छाप्यात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मटका व्यवसाय चालविणार्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मांडवा सागरी पोलिसांच्या या कारवाईचा दणका अवैध व्यवसायिकाला मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणपाडा परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये अवैधरित्या मटका जुगार चालू असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांना मिळाली. माहिती घेऊन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. यावेळी, रोख रकमेसह अन्य ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अजित पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त मेन नावाचा बेकायदा मटका जुगार सुरु होता. याबाबत पोलीस शिपाई जयेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्याकडून पैसे स्विकारून हा धंदा चालवित होता. पोलिसांनी या अड्ड्यावर कारवाई केल्याने अवैध धंद्यावर अंकुश बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आर. एन. शिद करीत आहेत.