गुरांची अवैध वाहतूक रोखली

पोलादपूरमध्ये चार गुरांसह पिकअप पोलिसांच्या ताब्यात

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील कापडे गावाच्या हद्दीत गुरांची कथित अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी तत्परता दाखवत एक पिकअप वाहन अडविले. त्यानंतर चार गुरांसह वाहन पोलादपूर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून चार गुरे घेऊन जाणारी पिकअप (एमएच 13 सीई 1976) कापडे गावाच्या हद्दीतून जात होती. या वाहनातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात चार गुरे आढळून आली. यानंतर गोरक्षकांनी वाहनासह गुरे पोलादपूर पोलीस ठाण्यात जमा केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली असून, पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार अनुज शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version