खालापूरमध्ये कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन

। खोपोली । प्रतिनिधी ।

खालापूर नगरपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तसेच कोरोना महामारीत सामाजिक अंतर राखण्यासाठी मागील वर्षापासून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गणेश विसर्जनसाठीची सज्जता नगरपंचायतीने करीत जुन्या तलाव येथे तसेच नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर दोन कृत्रीम तलाव तयार करून प्रदूषणमुक्तीसाठी मुर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन तात्कालीन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी करीत उत्तम व्यवस्था केली होती. शनिवारी दिड दिवसाचे गणपती विसर्जन कृत्रिम तलावात मोठ्या भक्तीभावाने करण्यात केले आहे.

दरवर्षी लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन जुन्या तलावात केले जाते. प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनवलेल्या असल्याने त्या पाण्यात लागलीच विरघळत नाही. विर्सजनानंतर मूर्तींची विटंबना होते.इ सोबत नदी तलावात व पर्यावरणाचे प्रदूषण होते.त्यातच तलावात गाळ असल्याने विसर्जन करताना जिवितहानी होवू शकते त्यामुळे जिवितहानी टाळण्यासाठी तात्कालीन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी मागील वर्षापासूनच खालापूर नगरपंचायतीच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आणि यंदाही दिड दिवसाचे गणपती विसर्जन गणेश भक्तांनी भक्तीभावाने केले आहे.

Exit mobile version