| हमरापूर | वार्ताहर |
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पेण तालुक्यातील वाशी येथे ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच संदेश ठाकूर, तसेच उपसरपंच कोमल म्हात्रे, माजी उपसरपंच सुरेखा पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य सुनील पाटील, प्रियांका पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गडदे व सर्व सदस्य तसेच मंदिराचे ट्रस्टी आणि श्री सेवक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली तलावात विसर्जन करण्याची पद्धत ग्रामपंचायत वाशी यांनी मोडीत काढून जल प्रदूषण थांबाविण्याचे पाऊल टाकले. ग्रामपंचायतीतील सर्व भाविकांना आवाहन करून माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये जलप्रदूषण थांबवण्यासाठी सहभाग घेऊन पाच दिवसाचे गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने ग्रामपंचायतीने तयार केलेल्या कृत्रिम साठा विहिरीत गणेश विसर्जन करण्यात आले. ज्या भाविकाने गणेश विसर्जन कृत्रिम साठा विहिरीत केले, त्यांना मान्यवराच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक भाविकांनी कृत्रिम साठा विहिरीत विसर्जन करुन पर्यावरण (जलप्रदूषण )राखले.
सदर प्रसंगी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन सहकार्य केले. या अभियानात सहभागी झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गडदे यांनी आभार मानले.