महाराष्ट्र बंदचा पनवेलमध्ये परिणाम

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

दिल्लीतील जंतर-मंतर येथे परीक्षा प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम गुरूवारी (दि.23) पनवेलमध्ये दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलनामुळे काही काळ चारही दिशांनी वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध करावा, अशी मागणी केली.

Exit mobile version