सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यातील देवरायांना मिळणार संरक्षण

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

सर्वोच्च न्यायालयाने देवरायांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील इतर ठिकाणच्या देवरायांसह सिंधुदुर्गातील 1 हजार 497 देवराया आता अधिक संरक्षित होणार आहेत. परंपरागतरित्या संरक्षित देवरायांच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाला दिले आहेत.

देवरायांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण योजना विकसित करण्यास न्यायालयाने सुचविले आहे. पर्यावरण अभ्यासकांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व लाभलेल्या देवरायांसारखा महत्त्वाचा अधिवास वाचवणे गरजेचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देवरायांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत समुदाय राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याबाबतच्या सूचनाही न्यायालयाने केली आहे. न्या. भूषण गवई, न्या. एस. व्ही.एन. भट्टी आणि न्या. संदीप मेहता यांच्या विशेष खंडपीठाने ही शिफारस राजस्थानच्या लुप्त होत चाललेल्या उपवनांवर प्रकाश टाकणार्‍या याचिकेवर आधारित केली आहे.

कोकणातील निसर्गठेवापवित्र देवरायांना वेगवेगळ्या प्रदेशांत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग, दोडामार्ग येथील दुर्मीळ कान्हळाची (मायरेस्टिका स्वॅम्प) देवराई आणि आंबोलीतील हिरण्यकेशी मातेच्या देवराईला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. सिंधुदुर्गात किल्ले निवतीमध्ये डुंगोबाची देवराई कांदळवन व तिच्या सहयोगी अशा 12 प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे.

अशा आहेत देवराया
एका नोंदीनुसार रत्नागिरीत 1736, सिंधुदुर्गात 1497, पुणे जिल्ह्यात 236, कोल्हापूरात 185, ठाण्यात 32 देवराया असून संपूर्ण महाराष्ट्रात 3768 इतक्या देवराया आहेत. ‘संपूर्ण पश्‍चिम घाटातील देवराई, पवित्र उपवनांच्या संवर्धनासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. या पवित्र उपवनांना सामुदायिक राखीव म्हणून अधिसूचित केल्याने समुदायाच्या सहभागासह जंगलांच्या या मूळ कप्प्यांचे संरक्षण आणि व्यवस्थापन होईल,’ असे पर्यावरण अभ्यासकांनी म्हटले आहे.
न्यायालयाच्या सूचना
देवरायांचे क्षेत्र, स्थान आणि व्याप्ती ओळखण्यासाठी त्यांच्या सीमा स्पष्टपणे चिन्हांकित कराव्यातमानवी वस्ती, शेती किंवा इतर कारणांमुळे जंगलतोड होऊन देवरायांचे आकार कमी होण्यापासून संरक्षण केले जावे देवरायांची नैसर्गिक वाढ आणि विस्तार सामावून घेण्यासाठी या सीमा लवचिक असाव्यात
Exit mobile version