ओबीसीच्या लढयात शेकापक्षाची महत्वपूर्ण भुमिका- पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ओबीसींबाबत महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावर शेकापक्ष नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी ओबीसी लढयाचे नेतृत्व तत्कालिन शेकापक्षाचे खासदार स्व. दि. बा. पाटील यांनी केले होते. तसेच या लढयात शेकापक्षाची महत्वपुर्ण भुमिका असून 28 टक्के आरक्षण मिळवून देण्यात शेकापक्षाची महत्वाची भुमीका असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला माहित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील मोठे राजकारण केले जात आहे. त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना माजी आमदार पंडित पाटील म्हणाले की, ओबीसीचा लढा शेकापक्षाचे तत्कालिन सरचिटणीस माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिला गेला. आता ओबीसींचे राजकारण करणार्‍या पक्षापैकी त्यावेळी ना भाजपाने भाग घेतला की काँग्रेसनेही नाही भाग घेतला. त्यावेळी शेकापक्षाचे नेते दि. बा. पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, विठ्ठलराव हांडे, एन. डी पाटील, गणपतराव देशमुख, मोहन पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवला होता. 27 टक्के आरक्षण द्यायला पाहिजे ही मागणी माजी पंतप्रधान व्हि. पी. सिंग यांनी केली. त्यावेळी दि. बा. पाटील खासदार होते. त्यावेळी महाराष्ट्रात शेकापक्ष प्रमुख पक्ष होता. शेकापक्षानेच राज्यात या आंदोनलाचे नेतृत्व केले. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीत महत्वपूर्ण योगदान होते. त्यावेळी शेकापक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. आता जे या विषयावर टिव टिव करीत आहेत त्यावेळी त्यांचे यात काहिच योगदान नव्हते. त्यामुळे आता ओबीसी राजकारणावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय असा सवालही पंडित पाटील यांनी केला आहे.

Exit mobile version