। रोहा । वार्ताहर ।
अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार यांचा शुक्रवारी 12 मे रोजी वाढदिवस असल्याने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बॅनर अलिबाग विधानसभा क्षेत्रात सर्वत्र झळकवले आहेत.पण या बॅनरच्या माध्यमातून स्थानिक आमदारांना मोठे करण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे तसेच युवा सेना प्रमुख व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे तसेच कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे अतिशय छोट्या स्वरूपात बॅनरच्या एका कोपर्यात लावण्यात आल्याने मुख्यमंत्री तसेच हिंदुहृदयसम्राट यांचा अपमान झाला असल्याची भावना कट्टर शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
जित उत्सव मंडळ व बैलगाडा नियोजन समिती अलिबाग रायगड यांच्या वतीने चाळमळा थळ येथे आमदार महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आमदारांवरील प्रेमापोटी संपूर्ण अलिबाग विधानसभा मतदारसंघात लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे आमदारांची प्रतिमा मुख्यमंत्री तसेच हिंदुहृदयसम्राट यांच्या पेक्षा मोठी कशी असा सवाल कट्टर शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.