संतोष सागवेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील पीएनपी नगरसमोर आज दुपारी 12 च्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या स्कूटी मोटार सायकलने अचानक पेट घेतला. यावेळी दुचाकीस्वार तसेच आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. तर संतोष सागवेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेने ही आग विझविण्यात यश आले.
शहरातील पीएनपी नगरसमोर आज दुपारी 12 च्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या स्कूटी मोटार सायकलने अचानक पेट घेतला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेच्या लक्षात ही बाब येताच दोघेही दुचाकीवरून उतरले. सदर आग विझविण्यासाठी स्कूटी चालक तसेच इतरांनी प्रयत्न केले मात्र आग विझत नव्हती. अलिबाग मधील सागवेकर ज्वेलर्स चे मालक संतोष सागवेकर यांच्या ही गोष्टी निदर्शनास येताच त्यांनी तत्परतेने लागलेली आग अग्निशमन यंत्र दुचाकीवर फवारून सदर आग विझवली. या आगीत दुचाकीचे नुकसान झाले आहे.