कर्जतमध्ये रिक्षा चालकाची मुलगी झाली डॉक्टर

| संजय गायकवाड | कर्जत |
कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव येथील सटूआईनगर परिसरातील रहिवाशी लक्ष्मण गोविंद कडू यांची मुलगी आरती लक्ष्मण कडू हिने वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टरकी पदवी संपादन केली आहे. आरतीचे वडील व्यवसायाने ईको रिक्षा चालक आहेत.आई गृहिणी, मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. तर बंधुराज अंकुश कडू हेही रिक्षा चालक आहेत. तिच्या कुटुंबात कोणतीच शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसताना व आर्थिक परिस्थिती देखील सक्षम नसताना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा तिच्या धाडसी निर्णयाला घरातून पाठबळ मिळाले. परिस्थितिपुढे हार न मानता आरती वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.


आरतीने तिच्या यशाचे श्रेय तिचे शिक्षक वर्ग, आई-वडील, मोठे बंधु अंकुश तसेच त्यांचे मित्र अमोल मानकामे, शरद खराडे, सलीम शेख, राहुल देशमुख आणि अनूप साळवी या सर्वांना जात आहे असे ती आवर्जून सांगत आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या रिक्षा चालकाच्या मुलीने सोबतीला असलेली जिद्द आणि चिकाटीमुळे परिस्थितीने देखील हात टेकले आहे. इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नच्या जोरावर तसेच कुठेही परिस्थितिचा बाऊ न करता आरतीने वैद्यकीय परीक्षेत यश संपादन केले आहे. आरतीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केल जात आहे.भिसेगावातली एक मुलगी डॉक्टर झाली आहे, आरती या गावातली पहिली डॉक्टर झाली आहे. याबाबत गावकर्‍यांना डॉ. आरतीचा सार्थ अभिमान वाटतो.

Exit mobile version