खोपोली | वार्ताहर |
खालापूर नगरपंचायतमधील वार्ड क्र. 2 मध्ये शेकापच्या शिवानी जंगम तर अपक्ष दीपाली पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शेकापकडून संतोष जंगम तर शिवसेनेकडून मारूती पवार हे दोघे एकमेकांसमोर निवडणुूकीला सामोरे जात आहेत.
खालापूर नगरपंचायतीची प्रभाग क्र. 2 मधील निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे निर्माण झालेल्या न्यायालयीन अडचणीत सापडली होती.या प्रभागाची निवडणूक पुढे ढकळण्यात आली होती अखेर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या प्रभागातून सर्वसाधारण उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. येथील एका जागेसाठी शेकापच्या नेत्या माजी नगराध्यक्षशिवानी जंगम, जंगम यांनी शेतकरी कामगार पक्षातर्फे भरलेले अर्ज वैध ठरले आहेत.मारुती पवार व मंदा भोसले यांनी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता तर अपक्ष म्हणून मारूती पवार आणि दीपाली पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता असे एकूण सहा उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती.
एकूण सहा पैकी दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते त्यामुळे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अखेर दोन जणांमध्ये सरळ लढत होणार आहे. निवडणूक अटीतटीची होईल असेच चित्र सध्यातरी मतदारसंघातील वातावणातून दिसून येत आहे.