नाक्यावरील करणीमुळे उमेदवारांना धाकधूक
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील बिरवाडीमध्ये मतदानाच्याच दिवशी भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावर एका रस्त्यावर मधोमध तीन मडकी आणि नारळ रचून ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. लाल आणि काळ्या फडक्याने मडक्याचं तोंड बंद करून खाली नारळ अशा स्वरूपात हा भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आला आहे.
बिरवाडी आसनपोई रस्त्यावरील नाक्यावर आगदी मधोमध हा उतारा ठेवण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणी देवदेवस्की केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी हा सगळा प्रकार उधळून लावत ही मडकी फेकून दिली आहेत.