| पनवेल | वार्ताहर |
गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जवळपास 12 हजार रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे.
कळंबोली सर्कल जवळील साईबाबा मंदिराजवळ एक इसम गांजाजवळ बाळगून असल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळताच वपोनि उन्मेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.अजय चव्हाण, म.सा.पो.निरीक्षक तृप्ती शेळके, पो.उपनि.अमोल चौगुले व पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी कमल लोथी (38) या इसमास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून12 हजार रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगल्याप्रकरणी मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.