पीएनपीत वीरमाता, विरपत्नीचा सन्मान

| अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी वेश्‍वी संकुल येथील प्रांगणात संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत शहीद जवान जनरल निलेश तुणतुणे वीरमाता श्रीमती निर्मला तुणतुणे आणि शहीद जवान जनरल तुकाराम सकपाळ कुटुंबियांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत तसेच विद्यार्थ्यांनी परेड संचलन आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. वीरमाता निर्मला तुणतुणे आणि शहीद जवान जनरल तुकाराम सकपाळ या कुटुंबियांना सन्मानपत्र आणि मायेची शाल देऊन संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अलिबाग शाखा अध्यक्षा शुभांगी जोगळेकर, सुरेखा पाटील, सुभाष पानस्कर, सरोज पानस्कर, सुप्रिया जेधे, इतर मान्यवर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version