रोह्यात कुंडलिका झाली तुडुंब

रोहा | प्रतिनिधी |
मागील 24 तासांपासून रोहा तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने धुवांधार रविवार असल्याचे चित्र दिसून येत होते. रविवारी सकाळपर्यंत तालुक्यात मागील 24 तासांत 184 मिमी पावसाची नोंद झाली असून रविवारी सकाळपासून देखील जोरदार पाऊस पडत आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील कुंडलिका व अंबा या दोन प्रमुख नद्यांसह विविध नाले ,ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.सोमवार आणि मंगळवारी होणारी आषाढी एकादशी यामुळे तरुणाईने आजच तालुक्यातील लहान ओढे,धबधब्यांवर जाऊन पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला असून काहींनी रविवार असल्याने व जोरदार पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने आखाडी साजरी केली आहे.रात्री कुंडलिका नदीच्या पाण्यामुळे तसेच डोंगर उतारावरून येणार्‍या ओढ्यांमुळे पिंगळसई भागात मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचले होते.यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत असली तरी नदीचे पाणी धोका पातळीच्या खाली असल्याने रोहा नागोठणे मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

Exit mobile version