अलिबागमध्ये एसओएस डे उत्साहात

। सोगांव । वार्ताहर ।
एसओएस बालग्रामचे संस्थापक, स्व. डॉ. हर्मन माइनर यांच्या जयंतीनिमित्त एसओएस दिन सोगांव येथील एसओएस बालग्राम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एसओएस दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित होते, यावेळी जयवंत गायकवाड, जगन्नाथ साळुंके, शुभांगी झेमसे, राम म्हस्के हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच एसओएस या संस्थेचे हिमांशू देबनाथ एसओएस बालग्राम संचालक, सावन कुमार गुप्ता सह बालग्राम संचालक, रियाज खान पठाण सामुदायिक उपक्रम संचालक, लीना के.प्रेमलता टी. रितू दिवान ओंकार नाथ, प्रशांत पवार, संजय कचरे आणि जयप्रकाश मिश्रा उपस्थित होते.

एसओएस दिन कार्यक्रमात डॉ. किरण पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. मुलांना व मुलांची उत्तम प्रकारे काळजी घेणार्‍या मातांना तसेच सर्व संचालक, कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याहस्ते संस्थेतील 10वी व 12वी च्या उत्तीर्ण झालेल्या मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले. जगन्नाथ साळुंके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनीही 10वी व 12वी च्या मुलांना स्वहस्ते पारितोषिक वितरण केले.

एसओएस चिल्ड्रेन व्हिलेज ऑफ इंडियाचे सरचिटणीस सुमंता कार यांनी ईमेलद्वारे मुलांना व मातांना शुभेच्छा दिल्या. श्रावणी नाईक या मुलीने सूत्रसंचालन केले.

Exit mobile version