उरणमध्ये कविसंमेलन उत्साहात

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
उरणच्या विमला तलावावर झालेल्या कविसंमेलनात ज्येष्ठांच्या वेदना मांडणार्‍या कविता आम्हा ज्येष्ठांना फारच आवडल्या. कारण त्या वेदना आम्ही भोगलेल्या असतात असे विचार या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक चंद्रकांतमुकादम यांनी मांडले. यावेळी बाळाराम म्हात्रे, रविंद्र सुर्यवंशी यांनीही या संमेलनातून मिळालेला आनंद व्यक्त केला. कोकण मराठी साहित्य परिषद, मधुबन कट्टा, उरणच्या झालेल्या कविसंमेलनात रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, वसंत राऊत, भास्कर पाटील, हमाली म्हात्रे, सुजित डाकी, भ.पो.म्हात्रे, संजय पाटील आदी कवींनी आपापल्या मनोवेधक अशा कविता सादर केल्या. यावेळी रमेश माळी, नारायण पुगावकर, बी.के.पार्टे, विजय गमरे, मोहन म्हात्रे, मारुती तांबे, भुवनेश पाटील, एम.एस.सुळे, अरविंद विठ्ठल, शिरीष कांबळे आदी नागरिक उपस्थित होते. स्वागत गीत भगवान म्हात्रे, भास्कर पाटील यांनी गायले. सूत्रसंचालन म. का. म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version