पहिल्याच पावसात माथेरानचा रस्ता झाला चिखलमय

। कर्जत । प्रतिनिधी ।
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेले माथेरान मधील सखाराम तुकाराम पॉईट ते अमनलॉज दरम्यान पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. हा चिखल ताबडतोब नगरपालिकेने काढून टाकल्याने नागरिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्याच पावसात माथेरान मधील रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिकांना तसेच पर्यटकांना चिखल तुडवत ये-जा करावी लागत होती. शनिवार, रविवार असल्याने पर्यटक मोठ्यात प्रमाणात माथेरानला आले होते. ही बाब येथील प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्परता दाखवत नगरपालिकेच्या माध्यमातून चिखल काढून रस्ता चिखलमुक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळला असून रस्त्यावरून चालणे सुलभ झाले आहे. नेहमीच कामात तत्पर असलेल्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version